About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Wednesday 19 July 2017

दि. 24.07.2017 व 25.07.2017 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय,नंदुरबार यांच्या अधिनस्त आहरण व संवितरण अधिकारी यांचे पीएफआरडीए यांच्या आदेशानुसार प्रशिक्षण घेणे बाबत.

दि. 24.07.2017 व 25.07.2017 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय,नंदुरबार यांच्या अधिनस्त आहरण व संवितरण अधिकारी यांचे पीएफआरडीए यांच्या आदेशानुसार प्रशिक्षण घेणे बाबत.
                  महत्वाची सुचना

   

    निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) व राज्यं अभिलेख व देखभाल अभिकरण यांच्या कडुन मिळालेल्या सुचनेनुसार नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत उपकोषागार कार्यालयांच्या  अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी  व तसेच त्यांच्या आस्थापनेवरील NPS सभासदांसाठी भारत सरकारच्या पीएफआरडीए यांच्याकडील अधिका-यांमार्फत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 
तळोदा, शहादा, धडगाव या उपकोषागार कार्यालयांच्या  अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी  व तसेच त्यांच्या आस्थापनेवरील NPS सभासदांसाठी दि.24/07/2017 रोजी औदयोगिक प्रशिक्षण संस्था हॉल, जुना मोहाडी रोड, शहादा येथे सकाळी 11.00 वाजता 
                            व 

नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालय अधिनस्त व अक्कलकुवा, नवापूर या उपकोषागार कार्यालयांच्या  अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी  व तसेच त्यांच्या आस्थापनेवरील NPS सभासदांसाठी
दि.25/07/2017 रोजी बिरसामुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सकाळी 11.00 वाजता एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येतआहे.

तरी सर्व आहरण  संवितरणअधिकारी यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.गजाननपाटील यांनी केले आहे.

काही क्षणचित्रे GST कायदयाच्या अनुषंगाने शासकीय कार्यालय/आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाच्या कार्यवाहीविषयी प्रशिक्षण.........दि.19/07/2017














Friday 14 July 2017

GST कायदयाच्या अनुषंगाने शासकीय कार्यालय/आहरण व संवितरण अधिकारी यांनी करावयाच्या TDS कपातीच्या कार्यपद्धतीविषयी प्रशिक्षण.........दि.19/07/2017 रोजी सकाळी 11:00 वा

महत्वाची सुचना
GST कायदयाच्या अनुषंगाने शासकीय कार्यालय/आहरण संवितरण अधिकारी यांनी करावयाच्या TDS कपातीच्या कार्यपद्धतीविषयी प्रशिक्षण
      
          नंदुरबार जिल्हातील सर्व आहरण संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, दि.01 जुलै 2017 पासुन लागु करण्यात आलेल्या MGST/CGST कायदयामधील सेक्शन 51 नुसार सर्व राज्यशासकीय केंद्रशासकीय विभागांना,आस्थापनांना,स्थानिक संस्थाना तसेच शासकीय एजन्सीजना GST च्या अनुषंगाने RC मिळविणे,TDS भरणा करणे,रिर्टन फाईल करणे TDS Certificate Issue करणे . कार्यवाही करणेबाबत जबाबदार आहेत.तरी सदर अनुषंगाने नंदुरबार जिल्हातील सर्व शासकीय आहरण संवितरण अधिकारी यांना GST बाबत विक्रीकर विभाग नंदुरबार यांच्याकडुन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. सदर प्रशिक्षण  दि.19/07/2017 रोजी सकाळी 11:00 वा जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथीलविर बिरसा मुंडासभागृहामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. तरी सर्व आहरण संवितरण अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.गजानन पाटील यांनी केले आहे.


  जिल्हा कोषागार अधिकारी,   नंदुरबार               

Thursday 13 July 2017

काही क्षणचित्रे जिल्हा कोषागार कार्यालय नंदुरबार आयोजित NPS बाबत नंदुरबार जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / सर्व डिसीपीएस -एनपीएस योजनेचे सभासद यांची कार्यशाळा ..दि 11/07/2017..


काही क्षणचित्रे जिल्हा कोषागार कार्यालय नंदुरबार आयोजित NPS बाबत नंदुरबार जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / सर्व डिसीपीएस -एनपीएस योजनेचे सभासद  यांची कार्यशाळा ..
दि 11/07/2017......









Friday 7 July 2017

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने (NPS) ची दि.11.07.2017 कार्यशाळा आयोजनाबाबत........

   

     राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने (NPS) ची दि.11.07.2017 कार्यशाळा आयोजनाबाबत..


          निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) व राज्यं अभिलेख व देखभाल अभिकरण यांच्या कडुन मिळालेल्या सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवाडा दि.27.06.2016 ते दि.11.07.2016 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. तदनुषगांने नंदुरबार जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / सर्व डिसीपीएस -एनपीएस योजनेचे सभासद NPS बाबत समस्यांचे निराकरण होणे यांच्या आवश्यकं आहे. त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने दि.11/07/2017 रोजी बिरसामुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार                                     येथे सकाळी 11.00 वाजता कोषागार कार्यालयाद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
      तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी व डिसीपीएस/एनपीएस योजनेतील कर्मचारी यांनी  सदर कार्यशाळेचा लाभ घ्यावा.




                                                        जिल्हा कोषागार अधिकारी

                                                                नंदुरबार