About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Saturday 19 November 2016

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत

महत्वाची सुचना

   राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत              
            नंदुरबार जिल्हा कोषागारातून निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग शासन निर्णय दि 18/11/2016 नुसार हयातीचे दाखले दि.15 जानेवारी 2017 पर्यंत सादर करण्यास  मुदतवाढ देण्यात आली आहे.      महाराष्ट कोषागार नियम 1968 च्या नियम 335 व संदर्भाकित शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवृत्तीवेतन धारकांना / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षा दिनांक 01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला संबंधित निवृत्तीवेतनधारक ज्या बॅकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या बँकेमार्फत  संबंधित कोषागारास सादर केला जातो.सदयास्थितीत केंद्र शासनाच्या निर्णयानुसार रू.500 व रु.1000 च्या चलनी नोटा रदद झाल्याने त्या नोटा बदलुन देणे व बँक खात्यात भरणा करणे यासाठी कालमर्यादा विहित केली असल्याने बँकावर कामाचा ताण वाढला आहे.त्याअनुंषगाने केंद्र शासनाने केंद्रशासकीय निवृत्तीवेतनधारकांना/कुंटुबनिवृत्तीवेतन धारकांना हयातीचे दाखला सादर करण्यास दि.15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील दि 18/11/2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार हयातीचे दाखले दि.15 जानेवारी 2017 पर्यंत सादर करण्यास  मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी  सर्व संबंधीत राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांनी हयातीचे दाखले दि.15 जानेवारी 2017 पर्यंत  संबंधीत बँकेकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी. 
                                                                                     

Friday 18 November 2016

राज्य शासकीय निवृततीवेतन/कूटुंब निवृत्तीवेतन धारकांकरिता हयातीचे दाखले सादर करण्यासाठी जीवनप्रमाणपत्र (Digital Life Certificate)सुविधा......


  राज्य शासकीय निवृततीवेतन/कूटुंब निवृत्तीवेतन धारकांकरिता हयातीचे दाखले सादर करण्यासाठी  जीवनप्रमाणपत्र (Digital Life Certificate)सुविधा
 
            नंदुरबार जिल्हा कोषागारातून निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, सेवानिवृत्तीवेतन धारकांना दरमहा प्राप्त होणारे निवृततीवेतन नियमितपणे सुरु राहणयासाठी  दरवर्षी नोव्हेंबर महिन्‍यामध्ये निवृततीवेतन धारकांना हयातीचे प्रमाणपत्र आपल्या बँकेमार्फत अथवा थेट कोषागारात जमा करावे लागते. कागदाच्या स्वरूपामध्ये असलेले हे हयातीचे दाखले ब-याचवेळा कोषागारापर्यंत पोहोचवण्याच्या आत गहाळ होउ शकतात. हयातीचे दाखले पोस्टाने पाठविण्यामध्ये विलंब देखील होत  असल्याचे दिसून येते. हयातीचे प्रमाणपत्र कोषागारामध्ये वेळेवर मिळू न शकल्यास संबंधित निवृततीवेतन धारकांना त्यांचे निवृत्तीवेतन मिळण्यामध्ये अडचण किंवा विलंब होत असतो. या समस्येवर उपाय शोधण्याच्या हेतूने केंद्र शासनाने digital life certificate म्हणजेच संगणकीय व्यवस्थेदवारे हयातीचे दाखले स्वीकारण्यासाठी योजना तयार केली जाते. त्यासाठी केंद्र शासनाने “जीवनप्रमाण” (www.jeevanpramaan.gov.in) या नावाने वेबपोर्टल तयार केले आहे. आता राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतन धारकांना देखील त्यांचे हयातीचे दाखले देण्याकरीता केंद्र सरकारच्या या “जीवनप्रमाण” या वेबपोर्टलशी संलग्न करण्यात आलेले आहे.महाराष्ट्र शासन, वित्त विभाग शासन निर्णय दि.15 जानेवारी 2016 नूसार चालू वर्षी हयातीच्या दाखल्याबाबत नियमित पध्दतीबरोबरच जीवनप्रमाण प्रणालीदवारे जीवनप्रमाणपत्र (digital life certificate) ऑनलाईनरीत्या जिल्हा कोषागाराकडे  पाठवायचे आहे.
             या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीवेतन धारकांनी /कुटुंब‍ निवृत्तीवेतन धारकांनी पुढीप्रमाणे कार्यवाही करावी. याबाबत जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार व तसेच तालुकास्तरीय उपकोषागार कार्यालय- तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, नवापूर याठिकाणी निवृत्ती वेतन /कुटुंब निवृत्ती वेतन धारकांची बायोमेट्रीक घेण्याची म्हणजेच बोटांचे ठसे घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी निवृत्तीवेतन धारक व्यक्तीने आपली सर्व वैयकितक माहिती म्हणजेच त्यांचा पी.पी.ओ. क्रंमाक,  नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, किंवा ईमेल आयडी इत्यादी माहिती घेउन यावे. तेथे त्यांना ही माहिती जीवन प्रमाण पोर्टल वर भरण्यासाठी मदत केली जाईल. त्यांचे बायोमेट्रीक ऑथिंटिकेशन पूर्ण झाल्यावर त्याबाबत त्यांच्या मोबाईल वर त्यांना SMS प्राप्त होईल. यासाठी पी.पी.ओ.क्रंमाक अचूकरीत्या भरण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. निवृत्ती वेतन धारकांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांचा पीपीओ क्रंमांक कोषागार/उपकोषागार कार्यालयात तसेच बँकेमध्ये उपलब्ध असणा-या यादीवरुन खात्री करावी.ही कार्यवाही नोव्हेंबर 2016 पासून करावयाची आहे.
               जीवन प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जीवन प्रमाण संकेतस्थळावर Pensioner log-in केल्यास digital life certificate सादर करण्याची व कोषागार कार्यालयात स्वीकृती यशस्वीरीत्या झाली किंवा नाही, याची देखील माहिती संकेतस्थळावर आपल्याला मिळू शकेल.
              अर्थातच ही नवीन(digital life certificate) सुविधा आपल्याला मिळालेली एक जास्तीची सुविधा आहे. आतापर्यंत आपण वापरत असलेली कागदी हयातीचे प्रमाणपत्र किंवा दाखले हे यापुढे देखील देता येतील. त्यामूळे ज्यांना या सुविधेचा लाभ घेता येणे, अडचणीचे वाटत असेल, त्यांना यापूर्वी प्रमाणेच आपले हयातीचे दाखले आपल्या बँकेमार्फत, पोस्टाव्दारे किंवा थेट कोषागार किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपकोषागारामध्ये पाठविता येतील.

           आपल्या निवृत्तीवेतनाचे प्रदान नियमितपणे होण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये  तसेच त्यांनतर देखील या नवीन digital life certificate सुविधेचा जास्तीत जास्त सेवानिवृत्तीवेतन धारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, नंदुरबार श्री गजानन पाटील यांनी केले आहे.
         याबाबत अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रंमाकावर संपर्क साधावा.
1.जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार- 02564-210139/210046
2.उपकोषागार कार्यालय, तळोदा -02567-232380
3.उपकोषागार कार्यालय, अक्कलकुवा -02567-252733
4.उपकोषागार कार्यालय, धडगाव -02595-220524
5.उपकोषागार कार्यालय, नवापूर -02569-252050
6.उपकोषागार कार्यालय, शहादा -02565-225561


                                                                                     

                                                                                            जिल्हा कोषागार अधिकारी, नंदुरबार