About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Thursday 27 March 2014

निवृत्तीवेतन धारकांचा दि.11.03.2014 रोजीच्या बैठकिचे इतिवृत्त


इतिवृत्त

दिनांक 11 मार्च 2013 रोजी झालेल्या निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

                      मा.सहसंचालक,लेखा व कोषागारे नाशिक विभाग नाशिक यांचे दिनांक 22.10.2013 चे पत्र क्रमांक कोष2013/ निरी4/नस्ती क्रमांक 110(2) / नि.वे. आढावा/604/4177 अन्वये निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता दर तीन महिन्यांनी निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन योग्य ती पूर्व प्रसिदधी देवून दि.11.3.2014 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री.वि.शि.चव्हाण मा कोषागार अधिकारी,कोषागार कार्यालय,नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्ती वेतनधारकांचा मेळावा कोषागार अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आला.

                      श्रीमती रुपाली पुंडे मा.अप्पर कोषागार अधिकारी ( निवृत्तीवेतन) यांनी उपस्थित सर्व निवृत्तीवेतन धारकांचे कोषागार कार्यालयातर्फे स्वागत केले व निवृत्ती वेतनासंबंधी संबंधितांच्या काही अडचणी असतील तर त्या निसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले त्यास अनुसरुन श्री चि.ह.पवार यांनी 80 वर्षापेक्षा जास्त वय असणा-या निवृत्तीवेतन धारकांना 10% अतिरीक्त देय निवृत्तीवेतनाचा लाभ मिळावा याकरीता जिल्हा परीषदेव्दारे यादी मागविण्यात आली आहे. तथापी अन्य राज्य शासनाचे निवृत्तीवेतन धारकांनची यादी मागवणेत आली नसलेबाबत कोषागाराचे लक्ष वेधले याबाबत त्यांचे समाधान करताना कोषागार अधिका-यांनी सांगितले की, वाढीव निवृत्तीवेतन देण्याच्या मुदयास केवळ तात्विक मान्यता प्राप्त झाली असून याबाबत अदयाप शासननिर्णय अथवा शासनादेश कोषागारास प्राप्त झाले नाहीत सदर आदेश प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.

                         तदनंतर मयत निवृत्तीवेतन धारक आधार कौतिक बैसाणे यांच्या पत्नी विजयाबाई दामु धामरे यांना कुटुंब निवृत्तीवेतन सुरु करण्यात यावे असे निवृत्तीवेतन धारकांचे प्रातिनिधी व्दारे सुचित करण्यात आले.या बाबत मा.कोषागार अधिकारी यांनी अ.को.अ.(नि.वे) यांना निर्देशित केले मयत निवृत्तीवेतन धारकांची उर्वरीत रक्कम बँकेमार्फत DD ने प्राप्त होताच पुढील कार्यवाही तात्काळ केली जाते असे अ.को.अ.(नि.वे) यांनी सांगितले.

                            श्री.चिं.ह.पवार यांनी श्रीमती प्रामिला ज.पानपाटील यांचे थकीत निवृत्तीवेतन अदा करणेबाबत विनंती केली असता मा.कोषागार अधिकारी यांनी रु.20000 पेक्षा जास्त थकित रक्कम असल्यास सदर रक्कम प्रदान करणेकरीता मा.महालेखापाल मुंबई यांचे आदेशाची आवश्यकता असते असे सांगितले व सदर बाबतीत महालेखापालाशी पत्र व्यवहार करावा असे निवृत्तीवेतन शाखेस सुचित केले त्याबरोबरच निवृत्तीवेतन धारकांनानी विहीत वेळेत हयातीचे दाखले सादर केल्यास सदर समस्या उदभवणार नाहीत याबाबत उपस्थितांचे लक्ष वेधले.

                           श्री.कलाल गुरुजी यांनी दिनांक 31.03.2014 रोजीची बँकनिहाय निवृत्तीवेतन धारकांची यादी देणेबाबत सहकार्य करावे अशी विनंती केली व सदर यादी देणे बाबत मा.कोषागार अधिकारी यांनी आश्वासित केले

                           सरचिटणीस श्री शेवाळे यांनी या कोषागारामार्फत निवृत्तीवेतन धारकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातात तसेच नेहमी सहकार्याची वागणूक येथील कर्मचारी व अधिकारी देतात असे आवर्जुन नमुद केले तसेच हयातीचा दाखला देणे ही जबाबदारी नैतीक व कायदेशीर दृष्टया निवृत्तीवेतन धारकांची आहे याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

                          मा.कोषागार अधिकारी यांनी हयातीचे दाखले बचतीची प्रामाणपत्रे अन्य विहीत कागदपत्रांची पूर्तता विहित मर्यादेत सादर करुन कोषागारास सहकार्य करावे असे आवाहन उपस्थितांना केले व कार्यक्राम संपला असे जाहिर केले.