राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत
महत्वाची
सुचना
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन
धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत
नंदुरबार जिल्हा कोषागारातून निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब
निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग शासन निर्णय
दि 18/11/2016 नुसार हयातीचे दाखले दि.15 जानेवारी 2017 पर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट
कोषागार नियम 1968 च्या नियम 335 व संदर्भाकित शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवृत्तीवेतन
धारकांना / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षा दिनांक 01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा
दाखला संबंधित निवृत्तीवेतनधारक ज्या बॅकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या बँकेमार्फत संबंधित कोषागारास सादर केला जातो.सदयास्थितीत केंद्र
शासनाच्या निर्णयानुसार रू.500 व रु.1000 च्या चलनी नोटा रदद झाल्याने त्या नोटा बदलुन
देणे व बँक खात्यात भरणा करणे यासाठी कालमर्यादा विहित केली असल्याने बँकावर कामाचा
ताण वाढला आहे.त्याअनुंषगाने केंद्र शासनाने केंद्रशासकीय निवृत्तीवेतनधारकांना/कुंटुबनिवृत्तीवेतन
धारकांना हयातीचे दाखला सादर करण्यास दि.15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.त्या
धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक
यांना वरील दि 18/11/2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार हयातीचे दाखले दि.15 जानेवारी
2017 पर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात
आली आहे. तरी सर्व संबंधीत राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/कुटुंब
निवृत्तीवेतन धारक यांनी हयातीचे दाखले दि.15 जानेवारी 2017 पर्यंत संबंधीत बँकेकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी.
No comments:
Post a Comment