About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Wednesday 19 July 2017

दि. 24.07.2017 व 25.07.2017 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय,नंदुरबार यांच्या अधिनस्त आहरण व संवितरण अधिकारी यांचे पीएफआरडीए यांच्या आदेशानुसार प्रशिक्षण घेणे बाबत.

दि. 24.07.2017 व 25.07.2017 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय,नंदुरबार यांच्या अधिनस्त आहरण व संवितरण अधिकारी यांचे पीएफआरडीए यांच्या आदेशानुसार प्रशिक्षण घेणे बाबत.
                  महत्वाची सुचना

   

    निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) व राज्यं अभिलेख व देखभाल अभिकरण यांच्या कडुन मिळालेल्या सुचनेनुसार नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत उपकोषागार कार्यालयांच्या  अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी  व तसेच त्यांच्या आस्थापनेवरील NPS सभासदांसाठी भारत सरकारच्या पीएफआरडीए यांच्याकडील अधिका-यांमार्फत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 
तळोदा, शहादा, धडगाव या उपकोषागार कार्यालयांच्या  अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी  व तसेच त्यांच्या आस्थापनेवरील NPS सभासदांसाठी दि.24/07/2017 रोजी औदयोगिक प्रशिक्षण संस्था हॉल, जुना मोहाडी रोड, शहादा येथे सकाळी 11.00 वाजता 
                            व 

नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालय अधिनस्त व अक्कलकुवा, नवापूर या उपकोषागार कार्यालयांच्या  अधिनस्त असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी  व तसेच त्यांच्या आस्थापनेवरील NPS सभासदांसाठी
दि.25/07/2017 रोजी बिरसामुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सकाळी 11.00 वाजता एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येतआहे.

तरी सर्व आहरण  संवितरणअधिकारी यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.गजाननपाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment