About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Friday 16 March 2018

महत्वाची सुचना-नवनियुक्त कर्मचा-यांना प्रान क्रमांक मिळणेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रान क्रमांकाबाबत खात्री करणेबाबत


   उपरोक्त विषयान्वये नंदुरबार जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, वि.वि.शा.नि.अंनियो 1007/18/सेवा-4 दि.07.07.2007 मध्ये परिच्छेद क्रमांक 25 व 26 अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असलेल्या कर्मचा-याची बदलीने अथवा नविन नियुक्ती झाल्यास सदर कर्मचा-याचा प्रान क्रमांक मिळणेसाठी अर्ज करण्यापूर्वी सदर कर्मचारी यापूर्वी कुठल्याही राज्यशासनाच्या अथवा केंद्रशासनाच्या तसेच महामंडळे यांच्या सेवेत या कार्यालयात रूजू होण्यापूर्वी होते का? असल्यास सदर कर्मचा-यास यापूर्वी प्रान क्रमांक आहे किंवा कसे? याबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी खात्री करून अर्ज करणे अपेक्षित आहे.
परंतु असे निदर्शनास आले आहे की, सदरबाबत संबंधित कार्यालय खात्री न करता अर्ज करत आहेत ज्यामुळे संबंधित कर्मचा-यास दोन प्रान क्रमांक दिले जातात. ज्यामुळे नविन प्रान क्रमांक एनएसडीएल कडून रदद होण्याचे प्रमाण वाढत आहे. सदर नवीन प्रान सेवार्थ प्रणालीत संबंधित कर्मचा-याच्या DCPS क्रमांकास मॅप केलेला असल्यामुळे सदर DCPS कपातीची रक्कम प्रान खाती वर्ग करणेस कोषागारास अडचण निर्माण होत आहे. सदर रक्कम विहीत वेळेत प्रान खाती वर्ग न होण्याच्या विलंबास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी जबाबदार राहतील. तरी सदरबाबत गांभिर्याने खात्री करून प्रान क्रमांक मिळणेसाठी अर्ज करण्यात यावा. सदर कर्मचा-यास प्रान प्राप्त असल्यास तसे या कार्यालयास कळविण्यात यावे.


दिनांक-16.03.2018

No comments:

Post a Comment