About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Thursday 16 January 2014

निवृत्ती वेतन धारकांचा दिनांक 11.12.2013 मेळावा


इतिवृत्त

निवृत्ती वेतन धारकांचा दिनांक 11.12.2013 मेळावा

                   मा.सहसंचालक,लेखा व कोषागारे नासिक विभाग नासिक यांचे दिनांक 19.10.2013 चे पत्र क्रा.कोष 2013/ निरी-4 /न.क्र110(2) / निवृत्ती वेतन आढावा /604 अन्वये निवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यासंबंधी केलेल्या कर्यवाहीचा आढावा घेण्यासाठी निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा 11.12.2013 रोजी घेणेबाबत आदेशीत करण्यास आले होते. सदर आदेशास अनुसरुन दि.11.12.2013 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री.वि.शि.चव्हाण मा.कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला.

                श्रीमती रुपाली पुंडे अप्पर कोषागार अधिकारी (नि.वे.) यांनी जिल्हा व तालुका स्तरीय पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांचे व उपस्थित नि.वे.धारकांचे स्वागत केले तसेच कोषागार स्तरावरील निवृत्तीवेतन धारकांच्या काही अडचणी असल्यास निसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले.सदर आवाहनास अनुसरुन श्री तु.मो कलाल (गुरुजी) अध्यक्ष जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन यांनी कोषागार कार्यालय बदृल निवृत्ती वेतन धारकांची कोणतीही तक्रार नसलेबाबत सांगितले निवृत्ती वेतन धारकांना या कार्यलयातील अधिकारी व कर्मचा-यांकडून चांगली वागणूक मिळते तसेच निवृत्ती वेतन धारकांच्या अडचणी प्राथम्याने सोडवल्या जातात या करीता कार्यालयाचे कौतुक केले.

                 मा.कोषागार अधिकारी नंदुरबार यांनी निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचा दाखला प्राधीकृत अधिका-यांच्या स्वाक्षरीने सादर करावा तसेच निवृत्ती वेतन धारकांचा मृत्यु झाल्यास तात्काळ कोषागार कार्यालयास अवगत करावे जेणेकरुन कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान प्रक्रीया तत्पर करणे शक्य होईल असे निवृत्ती वेतन धारकांना आवाहन केले.

                श्री.कलाल गुरुजी यांनी अजुनही काही निवृत्ती वेतन धारकांना 4 थ्या व 5 व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन प्राप्त होत असलेबाबत अवगत केले मा.कोषागार अधिकारी नंदुरबार यांनी कोषागार स्तरावरील सर्व केसेस सुधारीत केल्या असल्याचे सांगितले. काही प्रकरणे संबंधित खात्यांनी करावयाची असलेने प्रलंबित आहेत. सदर प्रकरणांचा निपटारा होणेकरीता मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देणेबाबत सुचित केले.

                 श्री.चि.ह.पवार यांनी जि.प.येथे झालेल्या बैठकीत मा.कोषागार अधिकारी यांनी बँकेच्या व्यवहाराबाबत अतिशय चांगले मार्गदर्शन केल्याबदृल आभार मानले. श्री.रा.व.माळी(आप्पा) यांनी कुटूंब निवृत्ता वेतन संबंधित फरक कोषागार कार्यालयाकडून तात्काळ फरक प्रदान झाल्याबाबतचा स्वानुभव सांगितला नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएसन नंदुरबार यांचे दिनांक 24.11.2013 रोजी झालेल्या 10 व्या जिल्हा अधिवेशनात कोषागार कार्यालयाचे कामकाज सहकार्यपूर्ण व तत्पर असलेबाबत गौरव करण्यात आला.

                 श्रीमती पुंडे रुपाली अप्पर कोषागार अधिकारी (नि.वे) यांनी कोषागार स्तरावरून वारंवार पत्रव्यवहार होवून देखील काही निवृत्ती वेतन धारकांना ओळखपरेड करीता उपस्थित राहत नसलेबाबत उपस्थितांना अवगत केले. श्री.कलाल (गुरुजी) यांनी सदर प्रालंबित प्रकरणांची यादी देणे बाबत विनंती केली आणि जनसंपर्काच्या आधारे संबंधित निवृत्ती वेतन धारकांना अवगत करणेबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

                 निवृत्ती वेतन धारकांनच्या मेळाव्यात चहापानाचा कार्यक्राम पार पडल्यानंतर श्री. पवार यांनी सर्वांचे आभार मानले मा.अध्यक्षांनी कार्यक्राम संपल्याचे जाहीर केले.

 

 

No comments:

Post a Comment