About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Tuesday 24 July 2012

 सर्व् आहरण  व संवितरण  अधिकारी याना काळविन्यात येते  कि या  कोषागाराने  दिनांक  २४ . ०४ . १३ . पासून  सी . एम. पी . मार्फत  प्रदाने  सुरु  केली  आहेत . तरी यापुढे  देयके सादर करताना  सी . एम. पी  ची B D S   स्लीप  काढूनच देयके कोषागारात सादर करावीत . 

1 comment:

  1. हयातीचा दाखला नोव्हेंबर २०१२ अखेरपर्यंत कोशागारास सादर करणेबाबत
    सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना कळविण्यात येते की,शासन परिपत्रक वित्त विभाग क्र.टीआरडब्लू-१३८०/९९०२/पीआर/एदिएम-९ दि.२२/०३/८१ व टीआरदब्लू-१३८०/१४८४/सीआर-३४७/कोष-४/दि.१५/०५/१९८७ नुसार सर्व निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकानी दिनांक १ नोव्हेंबर रोजीचा/ नंतर सक्षम प्राधिकारी यांनी सही केलेलाहयातीचा दाखला त्यांनी निवडलेल्या बँकेमार्फत कमाल 30नोव्हेंबर२०१२ अखेरपर्यंत बँकेमार्फत सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा निवृत्तीवेतन धारक/कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांचे माहे डिसेंबर २०१२ पासून पुढील निवृत्ती वेतनाचे प्रदान त्यांचा हयातीचा दाखला कोशागारास प्राप्त होईपर्यंत रोखून ठेवण्यात येईल याची सर्व निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी नोंद घ्यावी.
    शासनाच्या मार्गदर्शक सुचने नुसार आपल्या बँकेच्या शाखेमध्ये सर्व निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे हयातीचे दाखले एकत्रितरीत्या उपलब्ध करून दिलेले आहेत .त्याची नमुना प्रत खालील प्रमाणे आहे.
    घोषणापत्र:
    आम्ही खालील सही करणार, सेवानिवृत्तीवेतन धारक/ कुटूंब निवृत्तीवेतन धारक घोषित करतो/ करते की,
    1. मी सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाचे अधिपत्याखालील तसेच सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक प्राधिकरणातील
    कोणतीही नोकरी स्विकारलेली नाही.
    2. मी पुनर्विवाह केला नाही. किंवा मी मागील एका वर्षात विवाहबध्द झालेलो/ झालेले नाही. व दरम्यान झाल्यास
    अशा कोणत्याही घटनेची माहिती कोषागार/ बँक यांना कळविणे माझ्यावर बंधनकारक राहील.
    (पुनर्विवाह तरतुद 60 वर्षे वय पूर्ण केलेल्या निवृत्तीवेतन धारकांना लागू नाही)

    BANK NAME : STATE BANK OF INDIA BRANCH NAME : NANDURBAR
    --------------------------------------------------------------------------------
    Sr. No.| NAME OF PENSIONER | PPO NO. | A/C NO. | SIGNATURE OF |
    | | | | PENSIONER |
    --------------------------------------------------------------------------------
    1 | | | | |
    | | | | |
    | | | | |
    | | | | |
    -------|--------------------|---------------|---------------|------------------|
    जर निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांना वैयक्तिक दाखला भरावयाचा असेल तर हयातीच्या दाखल्याचा नमुना खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरचा दाखला दि.30/११/२०१२ पूर्वी आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करून कोशागारास सहकार्य करावे, ही विनंती.
    हयातीच्या दाखल्याचा नमुना(word format) हयातीच्या दाखल्याचा नमुना.(pdf format)

    कोषागार कार्यालय,नंदुरबार


    ReplyDelete