About Me

The main intention of this Blog is to help the Employee & Pensioner who are in Maharashtra State Government and attached To Nandurbar District Treasury. Nandurbar District Treasury Welcomes & promotes the individuals & DDO's who wish to participate with us by Ideas, suggestions and any such tools which could help other from Administration and Pension issue.

Wednesday 1 February 2017

महत्वाची सुचना.....राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवाडा दि.01.02.2017 ते दि.15.02.2017 साजरा करणेबाबत

महत्वाची सुचना

निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) व राज्यं अभिलेख व देखभाल अभिकरण यांच्या कडुन मिळालेल्या सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवाडा दि. 01.02.2017 ते दि.15.02.2017 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / सर्व डिसीपीएस -एनपीएस योजनेचे सभासद यांच्या स्तरावर जागरूकता होणे आवश्यकं आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमध्ये जिल्हा कोषागार कार्यालय नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत विशेष शिबीर (Camp) आयोजित करण्यात येत आहे.

1.  सर्व सभासदांची नोंदणी पूर्ण करणे.त्यासाठी सीएफआरएफ फॉर्म भरण्याची कार्यवाही संबंधित सभासद व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्वरीत पूर्ण करणे आवश्यक असल्याची जाणीव करून देणे.
2.  सर्व सभासद IRA-COMPLIANT असणे आवश्यक असल्याने त्यासाठीची प्रलंबित कार्यवाही पूर्ण करणेसाठी आहरण व संवितरण यांना सूचित करणे.
3.  सभासदांची माहिती/तपशील एस-2 फॉर्मदवारे अदयावत करणे.
4.  सभासदांचे पत्ते, दुरध्वनी क्रमांक,नामनिर्देशन,बँक तपशील इत्यादी माहिती अदयावत करणे व सभासदांचे वेतनातून अंशदाने नियमीतरित्या कपात करणेची जबाबदारीबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.
5.  एनपीएस संबंधित उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सेवांबाबतही सभासद व आहरण व संवितरण अधिकारी यांना माहिती देणे.
6.  सर्व सभासदांनी त्यांचे आय-पिन/टी-पिन चा वापर करून तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या लॉगइन चा वापर करून अदयावत माहिती प्राप्त करून घेणेसाठी जागरूक करणे.
7.  प्रणालीत दाखल तक्रारींचे निवारण करणेची कार्यवाही मुदतीत करणेची दक्षता घेणे.
8.  सर्व् सभासदांचे मोबाईल क्रमांक अदयावत करून मोबाईल ॲप सुविधेचा वापर करणेसाठी प्रोत्साहित करणे. यामुळे सर्व सभासदांना त्यांचेशी संबंधित माहिती त्वरीत उपलब्ध्‍ होउ शकेल.
9.  दि.01/04/2015 नंतर सेवासमाप्ती झालेल्या कर्मचा-यांच्या क्लेमवरील कार्यवाही (Claim under Exit & Withdrawal) विहित कार्यपध्दतीनुसार करणेबाबत आहरण व संवितरण अधिका-यांना जागरूक करणे.

तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी व डिसीपीएस/एनपीएस योजनेतील कर्मचारी यांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.          

                                                      जिल्हा कोषागार अधिकारी
                                                                नंदुरबार